इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरवर होम लोन लाभ (जुनी प्रणाली)
आर्थिक वर्ष: 2024 - 2025
एकूण इन्कम टॅक्स लाभ ₹ 0.00 आहे
होम लोन पूर्वी देय इन्कम टॅक्स
होम लोन नंतर देय इन्कम टॅक्स
आत्ताच अप्लाय करा
इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
काही विशिष्ट इन्कम टॅक्स स्लॅब अंतर्गत येणारे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब प्रत्येक फायनान्शियल वर्षाला इन्कम टॅक्स भरण्यास जबाबदार आहेत. यासाठी, तुम्हाला इन्कम टॅक्सचे कॅल्क्युलेशन कसे करावे हे माहित असावे. तुम्ही मॅन्युअल मूल्यांकन करू शकता, तर त्रुटी येऊ शकते. बजाज हाऊसिंग फायनान्स तुम्हाला सुलभ डिजिटल इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर उपलब्ध करते. ज्याद्वारे तुम्ही सहजपणे वापरू शकता.
हे ऑनलाईन इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर हे होम लोनद्वारे तुम्हाला मिळणाऱ्या अंदाजित टॅक्स लाभांचा अंदाज घेण्यासाठी डिझाईन केलेले सोपे आणि सोयीस्कर टूल आहे. जर तुमच्याकडे होम लोन असेल आणि आर्थिक वर्ष 2024-25 आणि वर्ष 2025-26 साठी इन्कम टॅक्स ऑनलाईन कॅल्क्युलेट करायचे असेल तर तुम्ही तुमचे लिंग, ॲन्युअल इन्कम आणि भरलेला इंटरेस्ट आणि होम लोनवरील रिपेड प्रिन्सिपल यासारखे काही तपशील एन्टर करून असे करू शकता.
आमचे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर हे वापरण्यास सोपे ऑनलाईन फायनान्शियल टूल आहे, जे तुम्हाला तुमच्या इन्कमवर टॅक्स लाभ कॅल्क्युलेट करण्यास मदत करू शकते. हे एकूण टॅक्स लाभ रकमेसह होम लोन प्राप्त करण्यापूर्वी आणि नंतरचे देय टॅक्स प्रदर्शित करते.
सर्व होम लोन कॅल्क्युलेटर्स
आर्थिक वर्ष 2024-25 (एवाय 2025-26) साठी बजाज हाऊसिंग फायनान्स इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर कसे वापरावे
आमचे ऑनलाईन इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी या स्टेप्सचे अनुसरण करा:
स्टेप 1: कॅल्क्युलेटर सेक्शनमध्ये, तुमचे लिंग निवडा.
स्टेप 2: अचूक इन्कम तपशील प्रदान करा. भाडे इन्कम, सेव्हिंग्स इंटरेस्ट आणि डिपॉझिट वरील इंटरेस्ट यासारख्या इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या इन्कम सह तुमचे मूलभूत वेतन एन्टर करा. नोंद घ्या की ₹2,50,000 पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न टॅक्स सवलतीसाठी पात्र नसल्याने टॅक्स लाभ कॅल्क्युलेट करण्यासाठी वार्षिक उत्पन्न ₹2,50,000 पेक्षा जास्त असावे.
स्टेप 3: होम लोनवर पेड केलेली इंटरेस्ट रक्कम एन्टर करा.
स्टेप 4: होम लोनवर रिपेड केलेली प्रिन्सिपल रक्कम एन्टर करा.
इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर एकूण इन्कम टॅक्स लाभ, होम लोन घेण्यापूर्वी देय टॅक्स आणि होम लोन घेतल्यानंतर देय टॅक्स लाभ त्वरित प्रदर्शित करेल.
आर्थिक वर्ष 2024-25 (वर्ष 2025-26) साठी नवीन आणि जुन्या प्रणाली अंतर्गत इन्कम टॅक्स स्लॅब रेट्स
नवीनतम केंद्रीय अर्थसंकल्प आर्थिक वर्ष 2024-25 नुसार दोन टॅक्स प्रणाली आणि त्यांच्या इन्कम टॅक्स रेटचे विवरण खालीलप्रमाणे:
बजेट 2024 मध्ये घोषित नवीन इन्कम टॅक्स स्लॅब रेट
नेट ॲन्युअल टॅक्स योग्य इन्कम | नवीन टॅक्स प्रणाली स्लॅब रेट्स (अपवाद आणि कपात वगळता) | जुनी टॅक्स प्रणाली (अपवाद आणि कपात सहित) |
---|---|---|
₹2.5 लाख पर्यंत | सूट | सूट |
रु. 2.5 लाख ते रु. 3 लाख | सूट | 5% |
रु. 3 लाख ते रु. 5 लाख | 5% | 5% |
रु. 5 लाख ते रु. 6 लाख | 5% | 20% |
रु. 6 लाख ते रु. 9 लाख | 10% | 20% |
रु. 9 लाख ते रु. 10 लाख | 15% | 20% |
रु. 10 लाख ते रु. 12 लाख | 15% | 30% |
रु. 12 लाख ते रु. 15 लाख | 20% | 30% |
₹15 लाख पेक्षा अधिक | 30% | 30% |
60 आणि 80 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी इन्कम टॅक्स स्लॅब (आर्थिक वर्ष 2024-25)
टॅक्स स्लॅब | जुन्या प्रणाली अंतर्गत रेट्स (60 वर्षे) | जुन्या प्रणाली अंतर्गत रेट्स (80 वर्षे) | नवीन प्रणाली अंतर्गत रेट्स |
---|---|---|---|
₹3 लाख पर्यंत | शून्य | शून्य | शून्य |
₹3 लाख – ₹5 लाख | 5.00% | शून्य | 5.00% |
₹5 लाख – ₹6 लाख | 20.00% | 20.00% | 5.00% |
₹6 लाख – ₹9 लाख | 20.00% | 20.00% | 10.00% |
₹9 लाख – ₹10 लाख | 20.00% | 20.00% | 15.00% |
₹10 लाख – ₹12 लाख | 30.00% | 30.00% | 15.00% |
₹12 लाख – ₹15 लाख | 30.00% | 30.00% | 20.00% |
₹15 लाख पेक्षा अधिक | 30.00% | 30.00% | 30.00% |
इन्कम टॅक्स दायित्व कसे कॅल्क्युलेट करावे?
ऑनलाईन इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरद्वारे देय एकूण इन्कम टॅक्स निर्धारित करताना, टॅक्स कॅल्क्युलेटरमध्ये खालील बाबतीत अचूक डाटा एन्टर करा:
- नफा/वेतनातून तुमचे एकूण वार्षिक इन्कम
- इन्व्हेस्टमेंट, भाडे आणि अन्य सोर्स कडून इन्कम
- जर लागू असल्यास टॅक्स सवलत
- वाहतूक भत्ता आणि घर भाडे
एकदा तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला तुमचे एकूण इन्कम टॅक्स दायित्व जाणून घेणे शक्य ठरेल. जर टीडीएस तुमच्या सॅलरी मधून ऑटोमॅटिकरित्या कपात करण्यात आला असल्यास तर तुम्ही फॉर्म 26AS तपासू शकता, जे टीडीएस कॅल्क्युलेटर म्हणून कार्यरत आहे.
चलन 280 द्वारे तुम्हाला ऑनलाईन सबमिट करावयाची रक्कम मिळवण्यासाठी एकूण इन्कम टॅक्स दायित्व मधून टीडीएस वजा करा. जर तुम्ही एकूण टॅक्स दायित्वाच्या पेक्षा जास्त देय केले तर सरकार द्वारे तुम्हाला इन्कम टॅक्स दाखल करण्याच्या एका महिन्याच्या आत फरक परत केला जातो.
जर तुम्ही देय तारखेनंतर आयटी रिटर्न दाखल केल्यास तुम्हाला सेक्शन 234F अंतर्गत दंड आणि सेक्शन 234A अंतर्गत इंटरेस्ट देय करावा लागेल. तुमच्या इन्कमच्या सोर्सवर आधारित देय तारखा बदलू शकतात. जर तुम्ही नोकरदार असाल आणि वेतन मिळवत असाल तर तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची देय तारीख मूल्यांकन वर्षाच्या जुलै 31 आहे.
टॅक्सवर सेव्हिंग करण्याचा सोपा मार्ग म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणे होय. बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये, आम्ही तुम्हाला स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स वर हाऊसिंग लोन आणि लोन अगेंस्ट प्रॉपर्टी ऑफर करून तुमचे आर्थिक आणि वैयक्तिक ध्येय पूर्ण करण्यास मदत करतो.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये लागू विविध सेक्शन अंतर्गत एकूण इन्कमवर कपात
एकूण इन्कम टॅक्स वरील सूट तपासा:
-
सेक्शन 87ए
जर करदात्याचे इन्कम रु.5 लाखांपेक्षा कमी असेल, तर व्यक्ती जुन्या टॅक्स प्रणाली नुसार रु. 12,500 पर्यंत टॅक्स सवलतीसाठी पात्र असेल. नवीन टॅक्स प्रणाली अंतर्गत, रु. 7 लाख पर्यंतच्या इन्कम साठी रु. 25,000 पर्यंत सवलत उपलब्ध आहे.
-
सेक्शन 80C
टॅक्स दाता टॅक्स-सेव्हर फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, युनिट-लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन (यूएलआयपी) आणि इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम (ईएलएसएस) मध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंटसाठी रु.1.5 लाख पर्यंत रिबेटसाठी पात्र आहे.
-
सेक्शन 80ccd(1b)
टॅक्स दाता नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये त्यांच्या इन्व्हेस्टमेंट साठी रु. 50,000 पर्यंत अतिरिक्त टॅक्स कपात सहित एकूण रु. 2 लाखांपर्यत लाभ प्राप्त करू शकतो.
-
सेक्शन 80D
वैद्यकीय इन्श्युरन्स प्रीमियम बिलांसाठी करदाता रु. 25,000 पर्यंत टॅक्स सूट साठी पात्र आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी, कमाल मर्यादा रु. 50,000 आहे. या सेक्शन अंतर्गत प्राप्त करू शकणारी कमाल कपात रु. 1 लाख आहे.
-
सेक्शन 80g
या सेक्शन अंतर्गत चॅरिटी साठी दिलेली देणगी ही पूर्णपणे टॅक्स फ्री आहे.
-
सेक्शन 80e
8 वर्षांपर्यंत एज्युकेशन लोन्स साठी भरलेल्या इंटरेस्ट वर 100% टॅक्स रिबेट लागू असते.
-
सेक्शन 80TTA/80TTB
सेव्हिंग्स अकाउंट मधील रु. 10,000 पर्यंत इंटरेस्ट इन्कम, टॅक्स कपातीसाठी पात्र असेल. वरिष्ठ नागरिक सेक्शन 80TTB अंतर्गत रु. 50,000 पर्यंत टॅक्स माफी प्राप्त करण्यास पात्र आहेत.
-
सेक्शन 80gg
घर भाडे भरण्यासाठी खर्च केलेले इन्कम हे टॅक्स सवलतीस पात्र आहे. जर तुम्हाला तुमच्या नियोक्त्याकडून एचआरए लाभ प्राप्त झाला नसल्यास हा सेक्शन लागू असेल..
*अटी लागू.
अस्वीकृती
हे कॅल्क्युलेटर केवळ सामान्य माहितीच्या हेतूसाठी प्रदान केले जाते आणि त्याला आर्थिक सल्ला म्हणून विचारात घेतले जाऊ नये. कॅल्क्युलेटरमधून मिळालेले परिणाम हे तुमच्या इनपुटवर आधारित आहेत आणि त्या वेळी लागू होणारे कायदे आणि सरकारी गाईडलाईन्स यांच्या आधारे ते बदलू शकतात. तथापि, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ('बीएचएफएल') वर माहिती अपडेट करण्यासाठी किंवा वर्तमान ठेवण्यासाठी कोणतेही बंधन नाही. यूजरला वेबसाईटवर असलेल्या माहितीच्या आधारावर कार्यवाही करण्यापूर्वी स्वतंत्र कायदेशीर आणि व्यावसायिक सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. वर नमूद केलेल्या माहितीवर विश्वास ठेवणे हे नेहमीच यूजरची एकमेव जबाबदारी आणि निर्णय असेल आणि यूजरने या माहितीच्या कोणत्याही वापराची संपूर्ण जोखीम गृहीत धरावी.
कोणत्याही परिस्थितीत बीएचएफएल किंवा बजाज ग्रुप, त्यांचे कर्मचारी, डायरेक्टर्स किंवा त्यांचे कोणतेही एजंट किंवा कोणतेही इतर पार्टी हे वेबसाईट तयार करण्यात, उत्पादन करण्यात किंवा डिलिव्हर करण्यात सहभागी असलेल्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, दंडात्मक, प्रासंगिक, विशेष, परिणामी नुकसानीसाठी (गमावलेले महसूल किंवा नफा, बिझनेसचे नुकसान किंवा डाटाची हानी) किंवा वर नमूद केलेल्या माहितीवर युजरच्या अवलंबून असलेल्या कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार असणार नाही.
इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर - एफएक्यू
इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट करावा हे येथे दिले आहे:
- तुमचे सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी किंवा कॅपिटल गेन यातून तुमचे एकूण उत्पन्न कॅल्क्युलेट करा किंवा निश्चित करा.
- इन्व्हेस्टमेंट आणि इन्श्युरन्स वरील वजावट यासारख्या सवलती आणि कपात वजा करून तुमचे नेट टॅक्स पात्र इन्कम कॅल्क्युलेट करा.
टॅक्स निश्चित करण्यासाठी पात्र एकूण सवलत आणि आर्थिक वर्षासाठी एकूण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करा. तुम्ही पात्र असलेले कोणतेही क्रेडिट वगळून टाका. तुम्ही तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट करण्यापूर्वी इन्कम टॅक्सच्या विविध घटकांविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. लागू इन्कम टॅक्स स्लॅबवर आधारित टॅक्स पात्र इन्कम वर इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. अचूक आकडेवारी मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरचा वापर करणे होय. होम लोन घेतल्यानंतर मिळालेले टॅक्स लाभ कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही आमचे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर वापरू शकता.
इन्कम टॅक्स ॲक्ट, 1961 अंतर्गत अनेक प्रकारच्या इन्कमला सूट दिली जाते . याला टॅक्स-फ्री इन्कम सोर्स म्हणून ओळखले जाते. यापैकी काही खालील गोष्टींची तुम्हाला माहिती असावी:
- कृषी उत्पन्न
- स्वेच्छा निवृत्ती किंवा विभक्त होण्याच्या वेळी मिळालेली रक्कम
- सरकारद्वारे मान्यताप्राप्त प्रॉव्हिडंट फंड कडून प्राप्त फंड्स
- सरकारी कर्मचाऱ्याला मिळालेली कोणतीही ग्रॅच्युटी
- पेन्शनच्या कम्युटेशन मध्ये कोणतेही पेमेंट
- हिंदू अविभाजित कुटुंबाची पावती
- पार्टनरशिप फर्म किंवा एलएलपी मधून शेअर
- अनिवासी भारतीयांनी कमाई केलेले विशिष्ट सोर्स किंवा पावत्या
- भारतात विदेशी व्यक्तींनी कमाई केलेले इन्कम आणि पावती
जर तुम्ही इन्कम टॅक्ससाठी पात्र असाल तर तुम्ही देय असलेले इन्कम निर्धारित करण्यासाठी इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरचा वापर करा.
व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी कमाल नॉन-टॅक्स पात्र इन्कम मर्यादा रु. 3 लाख आहे आणि समान मर्यादा वरिष्ठ नागरिकांसाठी देखील आहे. याव्यतिरिक्त, आर्थिक वर्ष 2023-24 पासून पुढे रु. 7 लाखांपेक्षा कमी इन्कम असलेल्या लोकांना टॅक्स सवलत देऊ केली जाते. 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुपर सीनिअर सिटीझन्सना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही किंवा वार्षिक एकूण उत्पन्नाच्या ₹5 लाख पर्यंत रिटर्न दाखल करावा लागत नाही
तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न ई-फाईल करण्यासाठी तुम्हाला खालील तपशील आणि डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत:
- तुमच्या आधार कार्डचा तपशील, पॅन कार्ड नंबर आणि तुमच्या वर्तमान ॲड्रेसचा पुरावा
- विशिष्ट आर्थिक वर्षासाठी तुमच्या नावे असलेल्या सर्व बँक अकाउंटचा तपशील
- इन्कमचा पुरावा जसे की सॅलरी स्लिप आणि सेव्हिंग्स बँक अकाउंटवरील इंटरेस्ट, आणि एफडी यासारख्या इन्व्हेस्टमेंटमधून इन्कमचा तपशील.
- इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80 किंवा चॅप्टर vi-a अंतर्गत क्लेम केलेली सर्व कपात
- आगाऊ टॅक्स पेमेंट आणि टीडीएस सारख्या टॅक्स पेमेंटचा तपशील
तुमच्या सोयीसाठी, सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स सोबत बाळगा. आगाऊ टॅक्स कॅल्क्युलेट करा आणि इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी टीडीएस कॅल्क्युलेटर वापरा.
इन्कम टॅक्स ऑनलाईन भरण्याचे एकाधिक लाभ आहेत. यापैकी काही लाभ खाली सूचीबद्ध केले आहेत:
- यामुळे इलेक्ट्रॉनिक टॅक्स रिफंड सुलभ होतो.
- त्रुटी कमी होतात.
- इन्कम आणि ॲड्रेसचा पुरावा म्हणून कार्य करते.
- तुम्हाला तुमचे नुकसान पुढील मूल्यांकन वर्षात वर्ग करण्यास मदत होते.
- ऑनलाईन दाखल करण्याद्वारे उशीराचे दंडात्मक शुल्क टाळा.
- इन्कम टॅक्स ऑनलाईन भरणे खूपच सुरक्षित आहे आणि गोपनीय आहे.
- तुम्हाला VISA प्रोसेसिंगसह इन्श्युरन्स आणि लाभ मिळू शकतो.
- इन्कम टॅक्स ऑनलाईन भरणे खूपच जलद आहे.
- तुम्हाला जलद कन्फर्मेशन पावती मिळते आणि ती रिअल-टाइम अपडेट्स प्रदान करते.
- टॅक्स गणनेसाठी टीडीएस कॅल्क्युलेटर वापरा कारण त्याने तुम्हाला अन्यथा इन्कम टॅक्स दाखल करण्यासाठी व्यावसायिकांवर खर्च केलेली रक्कम सेव्ह करण्यास मदत होते.
होम लोन प्राप्त करून सेव्ह केलेल्या फंडच्या रकमेची गणना करण्यासाठी बजाज हाऊसिंग फायनान्सच्या इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरचा वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला तुमचे इन्कम टॅक्स लाभ कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमची ॲन्युअल इन्कम, भरलेली इंटरेस्ट रक्कम आणि होम लोनवर रिपेड प्रिन्सिपल रक्कम एन्टर करणे आवश्यक आहे.
जर तुमच्याकडे पगार व्यतिरिक्त इतर इन्कम स्त्रोत असेल तर आगाऊ टॅक्स देय आहे. यामध्ये भाडे, भांडवली नफा, लॉटरी विनिंग आणि अन्य बाबींचा समावेश होतो. आगाऊ टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, आर्थिक वर्षात लागू इन्कम टॅक्स स्लॅब रेट अप्लाय करा. खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:
- कॅपिटल गेन्स, व्यावसायिक इन्कम, रेंट आणि इतर इन्कमचा अंदाज घ्या.
- एकूण टॅक्सपात्र उत्पन्न मिळविण्यासाठी वरील एकूण मिळकतीत सॅलरी इन्कम ॲड करा.
- तुम्हाला लागू असलेला इन्कम टॅक्स स्लॅब अप्लाय करा.
- टीडीएस स्लॅबनुसार टीडीएस कपात करा.
जर तुमचे इन्कम हे रु 5 लाख ते रु 10 लाख दरम्यान असेल तर तुम्हाला तुमच्या टॅक्स पात्र उत्पन्नाच्या 20% सरकारला देय करावे लागेल.
जर तुमचे इन्कम रु. 10 लाख पर्यंत असेल तर तुम्हाला तुमच्या टॅक्स पात्र इन्कमच्या 20% सरकारला देय करावे लागेल.
टॅक्स स्लॅब | रेट्स |
---|---|
रु. 3,00,000 पर्यंत | शून्य |
रु. 3,00,000 ते रु. 6,00,000 | रु. 3,00,000 पेक्षा जास्त असलेल्या इन्कमवर 5% |
रु. 6,00,000 ते रु. 9,00,000 | रु. 15,000 + रु. 6,00,000 पेक्षा जास्त इन्कमवर 10% |
रु. 9,00,000 ते रु. 12,00,000 | रु. 45,000 + रु. 9,00,000 पेक्षा जास्त इन्कमवर 15% |
रु. 2,00,000 ते रु.15,00,000 | रु. 90,000 + रु. 12,00,000 पेक्षा जास्त इन्कमवर 20% |
₹15,00,000 पेक्षा अधिक | रु. 1,50,000 + रु. 15,00,000 पेक्षा जास्त इन्कमवर 30% |
60 आणि 80 वर्षे दरम्यानच्या वयोगटातील व्यक्तींसाठी इन्कम टॅक्स स्लॅब
टॅक्स स्लॅब | रेट्स |
---|---|
₹ 3 लाख | शून्य |
₹3 लाख – ₹5 लाख | 5.00% |
₹5 लाख - ₹10 लाख | 20.00% |
₹10 लाख आणि अधिक | 30.00% |
80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी इन्कम टॅक्स
टॅक्स स्लॅब | रेट्स |
---|---|
₹ 0 - ₹ 5 लाख | शून्य |
₹5 लाख - ₹10 लाख | 20.00% |
₹10 लाख पेक्षा अधिक | 30.00% |