board of directors_collapse_banner

banner-dynamic-scroll-cockpitmenu_genericpage

corporateboarddirectorsnew_wc

संचालक मंडळ

Sanjiv Bajaj

संजीव बजाज

संजीव बजाज हे बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे चेअरमन, बजाज फायनान्स लिमिटेडचे चेअरमन आणि बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. बजाज ग्रुपच्या फायनान्शियल सर्व्हिसेस बिझनेसची होल्डिंग कंपनी असून भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक आहे. जिचा ₹ 58,447 कोटीहून ($ 7.14 बिलियन)* अधिकचा 9M एकत्रित महसूल आणि FY2022-23 साठी ₹ 4,648 कोटीहून ($ 568 मिलियन)* अधिक टॅक्स नंतरचा एकत्रित लाभ समाविष्ट आहे.

Rajeev Jain

राजीव जैन

राजीव जैन (जन्मतारीख 06 सप्टेंबर 1970), हे आमच्या कंपनीचे उपाध्यक्ष आणि माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. बजाज फायनान्स येथे राजीव यांनी कंपनीसाठी महत्त्वाकांक्षी वाढीचा मार्ग तयार केला आहे. कंपनी एका वळणाच्या टप्प्यावर आहे आणि कॅप्टिव्ह फायनान्स कंपनीपासून सुरू झालेला प्रवास ते भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण नॉन-बँक अशी प्रगती होत आहे.

Atul Jain

अतुल जैन

1 मे 2022 पासून अतुल जैन यांची बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते जवळपास 16 वर्ष बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल) सह कार्यरत होते नंतर त्यांनी एप्रिल 2018 मध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) चे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी जोखीम-विरोधी दृष्टीकोनासह मागील 4 वर्षांमध्ये संस्थेची मल्टी-फोल्ड ॲसेट वाढ होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि मागील दोन वर्षांमध्ये प्रमुख उद्योगाच्या संकटातून अखंडपणे मार्ग काढण्यास संस्थेला मदत केली आहे.

डॉ. अरिंदम कुमार भट्टाचार्य

डॉ. अरिंदम कुमार भट्टाचार्य, स्वतंत्र संचालक, इन्व्हेस्टर आणि बीसीजी चे वरिष्ठ सल्लागार, जेथे ते वरिष्ठ भागीदार आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवृत्त झाले. बीसीजीमध्ये त्यांनी अनेकवेळा नेतृत्व केले आणि बीसीजीची विचारशील नेतृत्व संस्था ब्रूस हेंडरसन इन्स्टिट्यूटचे सह-नेतृत्व आणि संस्थापक होते. बीसीजी इंडियाचे प्रमुख म्हणून त्यांनी जवळपास सहा वर्ष देशात बीसीजीच्या कार्याचे नेतृत्व केले. ते ग्लोबल ॲडव्हान्टेज प्रॅक्टिसच्या ग्लोबल लीडरशीप टीमचे सदस्य होते आणि यापूर्वी औद्योगिक वस्तू, सार्वजनिक क्षेत्र आणि सोशल इम्पॅक्ट प्रॅक्टिसच्या ग्लोबल लीडरशीप टीमचे सदस्य होते आणि बीसीजीच्या ग्लोबल ॲडव्हान्टेज प्रॅक्टिसचे संस्थापक आणि सह-नेतृत्व होते. बीसीजी फेलो म्हणून त्यांनी जागतिकीकरणावर त्यांचे संशोधन केंद्रित केले आहे आणि त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत ग्लोबलिटी - कम्पिटिंग विथ एव्हरीवन फ्रॉम एव्हरीव्हेअर फॉर एव्हरीथिंग आणि बीयाँड ग्रेट - नाईन स्ट्रॅटेजीज फॉर थ्रिव्हिंग इन ॲन एरा ऑफ सोशल टेन्शन, इकॉनॉमिक नॅशनलीझम अँड टेक्नॉलॉजिकल रिवोल्यूशन, आणि संबंधित विषयावर अनेक लेख लिहिले आहेत.

Anami Narayan Roy

अनामी नारायण रॉय

15 मे 1950 रोजी जन्मलेले अनामी नारायण रॉय, आमच्या कंपनीचे अकार्यकारी आणि स्वतंत्र संचालक आहेत. ते प्रतिष्ठित माजी पोलीस महासंचालक आहेत, ज्यांनी जवळपास 38 वर्ष भारत सरकारसोबत आणि महाराष्ट्रात भारतीय पोलीस सेवेमध्ये व्यतीत केली आहेत. त्यांनी महाराष्ट्रात व केंद्र सरकारसोबत असताना अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत, जसे की औरंगाबाद, पुणे व मुंबईचे पोलीस आयुक्त आणि ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून ते निवृत्त झाले.

Jasmine Chaney

जॅस्मिन चानी

श्रीमती जॅस्मिन चानी या सिडनहॅम कॉलेजमधून वाणिज्य पदवीधर आहेत आणि के.जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई युनिव्हर्सिटी मधून फायनान्समध्ये मॅनेजमेंट स्टडीजमध्ये मास्टर्स आहेत. त्यांच्याकडे क्रिसिल लिमिटेड (आता क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड) सह मॅनेजमेंट भूमिकांत काम करण्याचा जवळपास तीन दशकांचा कामाचा अनुभव आहे.

S M Narasimha Swamy

एस एम नरसिंह स्वामी

एस एम नरसिंह स्वामी हे आमच्या कंपनीचे स्वतंत्र संचालक आहेत. त्यांनी कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री आणि कॉमर्समध्ये मास्टर्स डिग्री दोन्ही श्री वेंकटेश्वर युनिव्हर्सिटी तिरुपती मधून प्राप्त केली आहे.

directorspac_wc

जाणून घेण्यासारखे

About Us - Overview, Story and Mission | Bajaj Housing

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या