बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड विषयी
स्केल आधारित नियमांनुसार आरबीआय द्वारे 'अपर-लेअर एनबीएफसी' म्हणून वर्गीकृत, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) ही बजाज फायनान्स लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे - संपूर्ण देशभरातील 88.11 दशलक्षपेक्षा अधिक कस्टमर्सना सेवा प्रदान करणाऱ्या भारतीय मार्केटमधील सर्वात वैविध्यपूर्ण एनबीएफसीपैकी एक आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यामध्ये असून, बीएचएफएल घरे किंवा कमर्शियल जागा खरेदी आणि रिनोव्हेशनसाठी व्यक्ती तसेच कॉर्पोरेट संस्थांना फायनान्स प्रदान करते.. तसेच, बिझनेस किंवा वैयक्तिक गरजांसाठी लोन्स अगेंस्ट प्रॉपर्टी आणि बिझनेस विस्तार हेतूसाठी खेळते भांडवल देखील प्रदान करते. बीएचएफएल निवासी आणि कमर्शियल प्रॉपर्टीच्या बांधकामात सहभागी असलेल्या विकासकांना फायनान्स तसेच विकसक आणि हाय-नेट-मूल्य असलेल्या व्यक्तींना लीज रेंटल डिस्काउंट देखील ऑफर करते. क्रिसिल आणि इंडिया रेटिंग्स कडून कंपनीला लाँग-टर्म कर्ज कार्यक्रमासाठी एएए/स्टेबल आणि शॉर्ट-टर्म कर्ज कार्यक्रमासाठी ए1+ रेटिंग प्रदान केले गेले आहे.
जाणून घेण्यासारखे
लोन प्राप्त करण्यासाठी, ईएमआय देय करण्यासाठी किंवा पेपरवर्क पूर्ण करण्यासाठी आमच्या नजीकच्या ब्रँचला भेट द्या.