OHL-व्हॉट्सॲप-फिक्स-हेडर

आता whatsapp मार्फत होम लोनसाठी अप्लाय करा

ohl-whatsapp-hero-banner

ohl-whatsapp-four-items

Digital Sanction 10 मिनिटांमध्ये इन-प्रिन्सिपल सँक्शन लेटर* 
Details केवळ 8 तपशील*
अप्लाय करण्यासाठी 
No App कोणत्याही ॲप डाउनलोडची आवश्यकता नाही 
ROI सुरुवात 8.50%* प्रति वर्ष

OHL-WhatsApp-Step5

Step0
Step1
Step2
Step3
Step4
Step0
Step1
Step2
Step3
Step4

ohl-whatsapp-faq-table-gv

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

बजाज हाऊसिंग फायनान्सने वेतनधारी आणि प्रोफेशनल अर्जदारांसाठी निरंतर होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेसची उपलब्धता केली आहे. संपूर्ण प्रोसेस ही WhatsApp वर पूर्ण केली जाऊ शकते. प्रोसेसला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या वेबसाईटवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करू शकता किंवा 750 750 7315 वर 'Hi' असा मेसेज करू शकता आणि कोणत्याही अतिरिक्त ॲप डाउनलोड शिवाय कोणत्याही एक्स्ट्रा शुल्काशिवाय आमच्या सर्व्हिसेसचा लाभ घेऊ शकता.

आमच्या WhatsApp होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेसच्या सुविधाजनक आणि सुलभता या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे इन-प्रिन्सिपल सँक्शन लेटर जे जर तुम्ही आमचे प्रारंभिक पात्रता निकष पूर्ण केले आणि इन-ॲप होम लोन ऑफर स्वीकारले तर तुम्हाला प्राप्त होईल.

तुम्ही प्रॉपर्टी खरेदीच्या वेळी तुमची इच्छित होम लोन रक्कम प्राप्त करण्यासाठी तुमच्या पात्रतेचा पुरावा म्हणून डॉक्युमेंट वापरू शकता.

कर्जदारांनी लक्षात घ्यावे की इन-प्रिन्सिपल सँक्शन लेटर मध्ये 'इन-प्रिन्सिपल' ऑफर समाविष्ट आहे. दुसऱ्या शब्दांत, अंतिम ऑफर या अधीन असतील: (अ) क्रेडिट, रोजगार, निवास, ओळख, प्रॉपर्टी इ. संबंधित पडताळणी तपासणी. (ब) तुमचे इन्कम आणि लोन परतफेड करण्याच्या क्षमतेच्या संदर्भातील बाबींचे प्रकटीकरण आणि (क) तुमच्या ॲप्लिकेशनवर प्रोसेसिंग करताना आमच्याद्वारे विनंती केलेले सर्व डॉक्युमेंट्स/माहितीची उपलब्धता.

whatsapp होम लोन ॲप्लिकेशन प्रवास जलद आणि त्रासमुक्त करण्यासाठी अर्जदारांकडून केवळ मर्यादित प्रमाणात माहितीची विचारणा केली जाते. तुम्हाला माहिती तयार ठेवण्यास मदत करण्यासाठी, आम्ही प्रोसेस दरम्यान तपासणी करू शकणाऱ्या मापदंडांची यादी # दिली आहे:

  • व्यवसाय प्रकार
  • लोन प्रकार - नवीन होम लोन किंवा बॅलन्स ट्रान्सफर
  • ओळख आणि वैयक्तिक माहिती, जसे की तुमचे नाव, जन्मतारीख आणि पिन कोड, अन्य पैकी
  • तुमच्या प्राधान्यित लोन रकमेसारखे लोन विशिष्ट तपशील
  • तुमचे मासिक इन्कम आणि दायित्वे यासारखे आर्थिक तपशील
  • प्रॉपर्टी तपशील

विनंती तपशील सबमिट केल्यानंतर आणि आमच्या मूलभूत पात्रता निकषांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला होम लोन ऑफर दिली जाईल. तुमचे इन-प्रिन्सिपल सँक्शन लेटर प्राप्त करण्यासाठी रु. 1,999 + जीएसटी चे नाममात्र शुल्क भरण्यासाठी पुढे सुरू ठेवा.

#अर्जदारांनी विचारात घ्यावे की त्यांना होम लोन मंजुरी आणि प्रोसेसिंगच्या वेळी अधिक तपशीलासाठी विचारणा केली जाऊ शकते.

बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोनमध्ये सहज पूर्तता करण्यायोग्य पात्रता मापदंड आहेत. ज्याद्वारे संभाव्य अर्जदारांना कोणत्याही त्रासाशिवाय लोन प्राप्त करणे शक्य ठरते. आमच्या स्पर्धात्मक ऑफरिंगचा लाभ घेण्यासाठी आमच्या मूलभूत निकषांची पूर्तता करा:

वेतनधारी अर्जदार स्वयं-रोजगारित अर्जदार
अर्जदार हा सार्वजनिक किंवा खासगी कंपनीत किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत किमान 3 वर्षांच्या कामाच्या अनुभवासह स्थिर इन्कम सोर्स असणारा वेतनधारी व्यक्ती असावा अर्जदाराने सध्याच्या उद्योगात 5 वर्षांपेक्षा जास्त बिझनेस सातत्य ठेवून स्वयंरोजगार केलेला असावा
अर्जदाराचे वय 23 आणि 75 वर्षांदरम्यान असावे** अर्जदाराचे वय 25 आणि 70 वर्षांदरम्यान असावे**
अर्जदार भारतीय असावा (एनआरआय सहित) अर्जदार भारतीय असावा (केवळ निवासी)

** लोनच्या मॅच्युरिटी वेळी कमाल वयोमर्यादा ही वय मानली जाते. याव्यतिरिक्त, प्रॉपर्टी प्रोफाईलनुसार अर्जदारांसाठी वयाची कमाल मर्यादा बदलाच्या अधीन आहे.

आवश्यक गरजांची पूर्तता करण्याद्वारे आणि योग्य क्रेडिट हिस्ट्री सादर केल्यावर वेतनधारी किंवा प्रोफेशनल अर्जदार हे बजाज हाऊसिंग फायनान्स कडून स्पर्धात्मक लोन रेट्स प्राप्त करू शकतात.

वेतनधारी फ्लोटिंग रेफरन्स रेट: 15.55%*

होम लोन इंटरेस्ट रेट (फ्लोटिंग)

कर्जाचा प्रकार प्रभावी आरओआय (प्रतिवर्ष)
होम लोन 8.50%* ते 15.00%*
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर 8.70%* ते 15.00%*
टॉप-अप लोन 9.80%* ते 18.00%*

संभाव्य अर्जदार रेपो रेट लिंक्ड होम लोन्सचाही लाभ घेऊ शकतात. अर्जदारांनी हे देखील लक्षात घ्यावे की फ्लोटिंग इंटरेस्ट रेट्सवर हाऊसिंग हेतूसाठी ॲडव्हान्स घेणाऱ्या वैयक्तिक कर्जदारांसाठी कोणतेही अतिरिक्त पार्ट-प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क नाही. फी आणि शुल्कांच्या संपूर्ण लिस्टसाठी, येथे क्लिक करा.

तुम्ही होम लोन ॲप्लिकेशनची प्रोसेस यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, आमचे कस्टमर प्रतिनिधी तुम्हाला पुढील स्टेप साठी गाईड करतील. याव्यतिरिक्त, त्रास-मुक्त प्रोसेसिंग आणि मंजुरीचा प्रवास सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला खालील डॉक्युमेंट्स सोबत बाळगण्याचा सल्ला दिला जातो:

  • केवायसी डॉक्युमेंट्स: तुमच्या ओळखीचा आणि ॲड्रेसचा पुरावा म्हणून काम करणारे डॉक्युमेंट्स. नोंद घ्या की पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 अनिवार्य डॉक्युमेंट्स आहेत.
  • इन्कमचा पुरावा: 3 महिन्यांची सॅलरी स्लिप
  • पात्रता: स्वयं-रोजगारित प्रोफेशनल साठी शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • फायनान्शियल: 6 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट, आयटीआर, पी अँड एल स्टेटमेंट (स्वयं-रोजगारित प्रोफेशनल्स साठी)

होम लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्सची लिस्ट सूचक आहे. कर्जदारांना त्यांची होम लोन पात्रता प्रदर्शित करण्यासाठी अतिरिक्त डॉक्युमेंट्स प्रदान करणे आवश्यक असू शकते.

सर्व अर्जदारांनी होम लोनसाठी आवश्यक प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सचा एक सेट देखील प्रदान केला पाहिजे, जसे टायटल डीड आणि वाटप पत्र.

बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोनची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे समाविष्ट आहेत:

  • rbi रेपो रेटसह लिंक केलेल्या पर्यायासह येणारे स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स
  • सुलभ घर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोन रक्कम
  • अतिरिक्त टॉप-अप पर्यायासह सुलभ बॅलन्स ट्रान्सफर सुविधा
  • 40 वर्षांपर्यंत विस्तारीत होऊ शकणाऱ्या कालावधीसह लवचिक रिपेमेंट प्लॅन्स
  • किमान डॉक्युमेंटेशन आणि सुलभ लोन पात्रता निकष
  • फ्लोटिंग इंटरेस्ट रेट्ससह वैयक्तिक कर्जदारांसाठी झिरो पार्ट-प्रीपेमेंट आणि फोरक्लोजर शुल्क
  • यशस्वी मंजुरी आणि डॉक्युमेंट पडताळणी पासून 48 तासांमध्ये* वितरण

बजाज हाऊसिंग फायनान्सने होम लोन ॲप्लिकेशन प्रवास सुलभ केला आहे. ज्यामुळे पात्र व्यक्तींना काही मिनिटांत आमच्या स्पर्धात्मक ऑफरिंगचा लाभ घेण्यास अनुमती दिली आहे. whatsapp मार्फत होम लोन साठी अप्लाय करताना तुम्हाला लाभ उपलब्ध असेल:

  • कालबद्ध ॲप्लिकेशन प्रोसेस
  • किमान पात्रतेची विचारणा
  • तुमची ऑफर कस्टमाईज करण्याचा पर्याय
  • त्वरित इन-प्रिन्सिपल सँक्शन लेटर
  • 24/7* उपलब्धता
  • प्रोसेसच्या प्रत्येक स्टेप वर सुरक्षित आणि डाटा एन्क्रिप्शन

ohl-whatsapp-tnc

अटी व शर्ती

  • व्हॉट्सॲपवर बजाज हाऊसिंग फायनान्स ऑनलाईन होम लोन सर्व्हिसेस निवडून आणि रजिस्टर करून, तुम्ही याद्वारे संमती देता आणि कंपनीला CIBIL आणि/किंवा इतर क्रेडिट माहिती कंपन्यांसह तपासणी सुरू करण्याची आणि अन्य प्रमोशनल मेसेजेससाठी व्हॉट्सॲपवर तुमच्याशी संपर्क साधण्याची परवानगी देता.
  • सर्व अंतिम होम लोन मंजुरी आणि वितरण हे बजाज हाऊसिंग फायनान्सच्या विवेकबुद्धीनुसार असेल.
  • कृपया अधिक माहितीसाठी आमचे तपशीलवार अटी व शर्ती डॉक्युमेंट पाहा.